...

सिंहगड रस्त्यावरच्या उड्डाणपुलाचे सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

पुणे : सिंहगड रस्त्यावर उभारलेला उड्डाणपूल सोमवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजता या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

 

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन उड्डाणपुलांचे काम हाती घेण्यात आले होते. यापैकी दोन पुल आधीच सुरू आहेत. मात्र, वडगाव बुद्रुक येथून पुण्याकडे येणारा पूल पूर्ण झाल्यापासून ही उद्घाटन अभावी बंद ठेवण्यात आला होता. या विलंबामुळे स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसेने या संदर्भात आंदोलने केली होती.

 

क्रेडिट कार्ड ते LPG गॅस :1 सप्टेंबरपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

 

दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांनीही आंदोलन करत प्रशासनावर दबाव आणला. तब्बल ११८ कोटी रुपये खर्चून उभारलेला हा पूल केवळ राजकीय कारणांमुळे वापरात न आणल्याचा आरोप नागरिकांनी केला.

 

याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केले होते. मात्र, शिवा काशीद चौक ते हिंगणे दरम्यानचा सिंहगड रस्त्यावरील हा पूल पूर्ण होऊनही खुला करण्यात आला नव्हता. गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री पुण्यात येत असल्याने आज या पुलाचे लोकार्पण होणार आहे.

 

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे सोमवारी(१ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे.

 

केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, “फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे. सिंहगड रस्ता परिसरातील दीर्घकाळाची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरेल.”

 

प्रकल्पाची माहिती

– एकूण लांबी: सुमारे २.५ किमी – पुण्यातील सर्वात लांब उड्डाणपूल

– एकूण खर्च: ११८ कोटी रुपये

– कामाचा कालावधी: सप्टेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२५ (नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण)

 

 

प्रमुख टप्पे

प्रथम टप्पा (१५ ऑगस्ट, २०२४): राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल (खर्च १५ कोटी).

– दुसरा टप्पा (१ मे, २०२५): विठ्ठलवाडी ते फनटाईम, २.१ किमी लांबीचा पूल (खर्च ६१ कोटी).

– तिसरा टप्पा (१ सप्टेंबर, २०२५): गोयल गंगा चौक ते इनामदार चौक, १.५४ किमी लांबीचा पूल (खर्च ४२ कोटी).

 

वाहतुकीची कोंडी होणार कमी

– दररोज हजारो प्रवासी, शालेय बस, व्यवसायिक वाहने आणि सार्वजनिक वाहतूक साधनांचा प्रवास अधिक सुकर.

– सिंहगड रस्त्यावरील प्रमुख चौक विना-अडथळा पार करण्याची सुविधा.

– नागरिकांचा दररोज १५ ते २५ मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार.

– सिंहगड रस्ता, धायरी, नन्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी, तसेच बेंगळुरू–मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार.

 

 

 

“पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर असून लोकसंख्या आणि वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीचा ताण प्रचंड असतो. अशा परिस्थितीत ११८ कोटींचा सिंहगड रस्ता उड्डाणपूल प्रकल्प हा पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.”- माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री 

 

Local ad 1