...

पुणे महापालिका निवडणूक : वार्ड रचनेवर आज दुपारी ३ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवण्याची शेवटची संधी

सर्वाधिक आक्षेप विमाननगर–लोणीकाळभोरमध्ये

पुणे : पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या वार्ड रचनेच्या मसुद्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेले आहेत. एकूण २,५०१ आक्षेप नोंदवले गेले असून बुधवारीच सर्वाधिक ९६६ आक्षेप दाखल झाले. फक्त चार प्रभागांतच तब्बल १,७६१ आक्षेप आले आहेत, तर उर्वरित वार्डांत मिळून सुमारे ७५० आक्षेप नोंदवले गेले आहेत. मनपाच्या ४१ पैकी ६ वार्डांविरोधात एकही आक्षेप आलेला नाही. १३ वार्डांवर १० पेक्षा कमी आक्षेप आहेत, तर २० वार्डांवर १० ते १०० आक्षेप दाखल झाले आहेत.

 

पुणे महापालिकेत 30 ते 46% कमी दरांनी निविदा ; कामाचा दर्जा धोक्यात?

 

सर्वाधिक आक्षेप विमाननगर–लोणीकाळभोरमध्ये

विमाननगर–लोणीकाळभोर (वार्ड ३) मध्ये सर्वाधिक ७०७ आक्षेप आले आहेत. येथील एका सोसायटीच्या सदस्यांनी एकत्रितपणे आपली सोसायटी वार्ड ४ खराडी–वाघोलीमध्ये समाविष्ट व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर नर्हे–वडगाव बु. (वार्ड ३४) मध्ये ५९०, तर मांजरी बु.–साडेसतरानळी (वार्ड १५) मध्ये २२८ आक्षेप दाखल झाले आहेत.

 

 

 

एका दिवसात तब्बल ९६६ आक्षेप

२२ ऑगस्ट रोजी वार्ड रचनेचा मसुदा जाहीर झाला. पहिल्या दहा दिवसांत फक्त ५९५ आक्षेप नोंदवले गेले होते. मात्र बुधवारी एकाच दिवशी तब्बल ९६६ आक्षेप दाखल झाले. आक्षेप नोंदवण्यासाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुणे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.


 

Local ad 1