पुणे महापालिकेत 30 ते 46% कमी दरांनी निविदा ; कामाचा दर्जा धोक्यात?

पुणे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत होणाऱ्या गडबडीवर लगाम लावण्यासाठी आयुक्तांनी विशेष समिती गठित केली आहे. रस्ते दुरुस्तीच्या निविदा 30 ते 46% कमी दराने आल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.