पुण्यातील नदी सुधार प्रकल्पामुळे नैसर्गिक प्रवाह धोक्यात !
महापालिकेवर खा. मेधा कुलकर्णी यांची टीका
पुणे, भाजपच्या महत्त्वाकांक्षी नदी सुधार प्रकल्पावर राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी (BJP MP Medha Kulkarni) यांनी जोरदार टीका केली आहे. या प्रकल्पामुळे नाईक बेट येथे नदीचा एक नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बंद झाला असून, याचे ठोस पुरावे महापालिका आयुक्तांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (pune nadi sudharna karyakram medha kulkarni criticism)
मोठी बातमी : पुणे शहरातील ११ हजार पथविक्रेत्यांना बिल आकारणी होणार
खा. कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीच्या मूळ प्रवाहात हस्तक्षेप केला जात आहे. एक लाख वर्षांचा इतिहास असलेल्या नदीचा प्रवाह धोक्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली असून, कॉंक्रिटीकरणामुळे पूररेषा निश्चित करणे कठीण होणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुस रोड कचरा प्रकल्प सध्या भिजत घोंगडे झाला आहे; तो तातडीने हलवावा. कोथरूडमधील एमआयटी टेकडी, गांधीभवन परिसर, तसेच कल्याणीनगर येथे सुरू असलेली अनधिकृत बांधकामे थांबवावीत. वडगाव बुद्रुक येथे अनधिकृत मशीद बांधकामाबाबत कारवाई करावी. रुफटॉप हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स यांच्यावर नियमबाह्यपणे सुरू असलेल्या व्यवसायांवर देखील कारवाई करण्याची मागणी.
पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी ; वनाज – चांदणी चौक आणि रामवाडी – वाघोली नवीन मार्ग
‘झारीतील शुक्राचार्य’ कोण?
गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खा. कुलकर्णी यांनी विचारले की, हे काम रोखणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत, याचा शोध प्रशासनाने घ्यावा. शहरातील वाहतूक कोंडी गंभीर स्वरूपाची असून, विकास आराखड्यानुसार रस्ते रुंदीकरणाची मागणी त्यांनी केली.
“आयुक्त बुडत्या जहाजाचे कॅप्टन”
शहरातील नागरी सुविधांची दयनीय अवस्था लक्षात घेता, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना बुडत्या जहाजाचे कॅप्टन केल्याची उपरोधिक टीका खा. कुलकर्णी यांनी केली. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.