पुणे महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेसाठी पहिल्यांदाच सॅटेलाईट व गुगल अर्थचा वापर होणार
प्रभाग रसचनेसाठी समिती गठीत
पुणे : आगामी पुणे महापालिका प्रभाग रचना करताना सॅटेलाईट व गुगल अर्थचा वापर करून पारदर्शक प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०११ च्या जनगणनेची आकडेवारी गृहीत धरून ही रचना केली जाणार आहे. (pune mahapalika prabhag rachana 2025 satellite google earth)
पुणे : लोणावळा-मावळ पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांनी का घेतला हा निर्णय ?
महापालिकेच्या हद्दीत सध्या ६ हजार ४०० प्रगणक गट आणि नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांचे प्रगणक गट धरून प्रभाग आखले जाणार आहेत. एका प्रभागात सरासरी ८४ ते ९२ हजार मतदार असतील. नवीन प्रभाग रचनेनुसार महापालिकेत १६५ नगरसेवक असण्याची शक्यता आहे. याआधी फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळल्याने नगरसेवकांची संख्या एकाने कमी होणार आहे. (pune mahapalika prabhag rachana 2025 satellite google earth)
सत्ताधाऱ्यांवर पक्षपाती रचनेचे आरोप टाळण्याचा प्रयत्न
या वेळी प्रभाग रचना करताना पारदर्शकता राखण्यासाठी मोठ्या रस्ते, नाले, ओढे, नैसर्गिक प्रवाह यांचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. (pune mahapalika prabhag rachana 2025 satellite google earth)
२० कर्मचाऱ्यांची विशेष समिती
पालिकेच्या आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार शहराची माहिती असणाऱ्या अभियंते, लिपिक, आयटी कर्मचारी, टंकलेखक आदी २० कर्मचाऱ्यांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. हे कर्मचारी प्रारूप प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणार आहेत. (pune mahapalika prabhag rachana 2025 satellite google earth)
पुणे पालिकेची आगामी निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे आदेश राज्य सरकारकडून आले आहेत. याचा अभ्यास करून पालिका पुढील नियोजन करण्यासाठी सज्ज आहे. आयुक्तांच्या आदेशाने शहराचे ज्ञान असणारे २० कर्मचाऱ्यांची कमिटी नेमण्यात आली आहे.
– प्रसाद काटकर, निवडणूक अधिकारी, पुणे महापालिका
इतिहास काय सांगते…
-
२०२२ मध्ये पुणे महापालिकेने ३५,५६,३२४ लोकसंख्येच्या आधारे ३ सदस्यांचे ५८ प्रभाग तयार केले होते.
-
आताची लोकसंख्या ३४,८१,३५९ मानून चार सदस्यांचा प्रभाग तयार होणार.
-
बहुतांश ठिकाणी चार सदस्यांचे प्रभाग असतील; काही ठिकाणी तीन व काही ठिकाणी पाच सदस्यांचे प्रभाग असण्याची शक्यता.
-
प्रारूप प्रभाग रचनेची प्रशासकीय तयारी पूर्ण.
-
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा आधार घेऊन प्रभाग रचना.
-
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या – ४,८५,०००
-
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या – ४०,६५४ (ST साठी एक आरक्षित प्रभाग निश्चित होणार)
-
प्रभाग रचना करताना “एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक” हे सूत्र लागू.
-
इमारती, रस्ते, ओढे, नाले यांच्या नैसर्गिक सीमारेषांचा विचार.