पुणे महापालिकेत 30 ते 46% कमी दरांनी निविदा ; कामाचा दर्जा धोक्यात?
आता निविदांवर ‘विशेष समिती’चा अंकुश
पुणे : पुणे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवर वारंवार होणाऱ्या गैरव्यवहार आणि अपारदर्शकतेच्या आरोपांनंतर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आयुक्तांनी निविदांची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. (pune mahanagar palika nivida gadbadi samiti)
महापालिका दरवर्षी शेकडो कोटींची विकासकामे करते. मात्र, निविदा प्रक्रियेवरून नेहमीच प्रश्न उपस्थित होतात. विशेष ठेकेदारांना फायदा मिळावा यासाठी अटी – पटीच्या शर्ती घालण्यात आल्याचे आरोप आहेत. घनकचरा आणि सुरक्षा विभागातील निविदांवर याआधीही वाद निर्माण झाले होते. अनेक वेळा अटींमुळे निविदा रद्द झाल्याने कामांमध्ये विलंब होऊन प्रशासनावर अतिरिक्त आर्थिक ताण आला.
क्रेडिट कार्ड ते LPG गॅस :1 सप्टेंबरपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
नवीन समिती निविदा उघडल्यानंतर नियमांचे पालन, पूर्वगणपत्रक, दर व निविदा मूल्य यांची सखोल तपासणी करणार आहे. कमी दराच्या निविदांमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत नेहमीच शंका निर्माण होते. त्यामुळे या समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
बालआधार कार्ड : शाळा प्रवेश, लसीकरण व आरोग्य सेवांसाठी आवश्यक ओळखपत्र
महापालिका आयुक्त यांनी निविदा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.यासमितीमध्ये मुख्यलेखापालांसह वरीष्ठ अधिकारी असणार आहेत. अ पाकिट उघडल्यानंतर ही समिती निविदेची तपासणी करणार आहे. पुर्वगणपत्रक तयार करताना नियमांचे पालन झाले आहे का? पुर्वगणपत्रक फुगवण्यात आले आहे का? दर आणि निविदेची किंमत याची तपासणी होणार आहे. महापालिका प्रशासनाला विशिष्ट विभागाच्या निविदा खुप कमी दराने येतात. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. यामागची कारणे सुध्दा शोधण्यात येणार आहेत. त्यामुळे निविदांमधील गडबडीला चाप लागणार आहे.
रस्ते दुरुस्तीच्या निविदांवर प्रश्नचिन्ह
नालेसफाईप्रमाणेच रस्ते दुरुस्तीच्या निविदा देखील मोठ्या प्रमाणात कमी दराने आल्या आहेत. यावेळी रस्ते दुरुस्ती व चेंबर समतलीकरणासाठी 30% ते 46% कमी दराच्या निविदा आल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे की इतक्या कमी दरात काम नीट होईल का, की फक्त कागदोपत्री दाखवले जाईल.
📍 क्षेत्रनिहाय निविदा स्थिती
सिंहगड कार्यालय : किरकटवाडी, नांदेड, खडकवासला, नरहे, नांदोशी गावांसाठी ₹84 लाखांची निविदा 39% कमी दराने; दुसरी निविदा 42% कमी दराने.
बिबवेवाडी कार्यालय : दोन निविदा – एक 35% तर दुसरी 36% कमी दराने.
धनकवडी-सहकारनगर कार्यालय : दोन निविदा – 32% व 36% कमी दराने.
कोंढवा कार्यालय : ₹84 लाखांची निविदा 46% कमी दराने.
कसबा-विश्रामबाग वाडा कार्यालय : ₹67 लाखांची निविदा 43% कमी दराने.