कही खुशी कहीं गम..! पुण्यातील जिल्हा परिषद रचनेत मोठा बदल ; राजकीय हालचालींना वेग !

२३ गावे PMC मध्ये ; जिल्हा परिषदेत २ प्रभाग कमी

पुणे : पुणे जिल्हा परिषद रचनेत मोठा बदल करत राज्य सरकारने अखेर ७३ सदस्यांची (गटांची) अंतिम यादी जाहीर केली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार ग्रामीण भागातील प्रतिनिधित्व अधिक संतुलित व न्याय्य करण्यात आले आहे. पंचायत समितीमध्ये एकूण १४६ गट निश्चित करण्यात आले आहेत. या बदलांमुळे पुण्यातील ग्रामीण लोकसंख्या, शहरीकरण आणि नव्या प्रभाग रचनेची सुसूत्रता स्पष्ट झाली आहे. (pune jilha parishad 73 sadasya rachana 2025)

 

World Blood Donor Day 2025 Special | रक्तदान शिबिरांची संख्या घटली; पुण्यात रुग्णांना रक्त मिळणे कठीण !

 

शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेमुळे पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. परिणामी जिल्हा परिषदेमधून २ प्रभाग व ४ पंचायत समिती गट कमी झाले आहेत. त्याचबरोबर जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर या पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढवण्यात आला आहे. यामुळे एकूण गटांची संख्या आता १४६ झाली आहे. २०१७ मध्ये पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या सुमारे ३६.९ लाख होती, ती आता ३३.८८ लाख इतकी झाली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे काही गावे PMC व PCMC हद्दीत गेली असून मावळ व देहूरोड हे नगरपरिषद म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

 

‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि आरोग्य विकासाची नवी दिशा !

 

२०११ च्या जनगणनेनुसार समतोल प्रतिनिधित्व

नवीन रचना २०११ च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आली आहे. लोकसंख्येनुसार समतोल प्रतिनिधित्व मिळावे हा शासनाचा उद्देश आहे. महापालिका व नगरपरिषद क्षेत्र वाढल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या काहीशी घटली आहे. या बदलांनंतर आता पुणे जिल्हा परिषद क्षेत्रात ७३ सदस्य असतील तर पंचायत समितीमध्ये १४६ सदस्य राहणार आहेत.

 

हे ही वाचा..

१) नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी  ; वंदे भारत एक्सप्रेस नांदेड ते मुंबई धावणार 

२) zilha parishad nivadnuk 2025। अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक, सिंधुदुर्ग सर्वात कमी जिल्हा परिषद गट ; तुमच्या जिल्ह्यात किती गट वाढले?

३) “हे पत्र २०३५ ला उघडून पहा” ; आठवणी जपणारा उपक्रम

४) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद गट कुठे सर्वाधिक, कुठे कमी? तुमच्या जिल्ह्यात किती जाणून घ्या !

आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाची पायरी

या संपूर्ण प्रक्रियेला ७३ वा घटनादुरुस्ती अधिनियम (73rd Constitutional Amendment) अनुषंगाने अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. नगरविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकांची प्रक्रिया आता अधिकृतपणे अंतिम टप्प्यात प्रवेश करणार आहे.

एक नजरात जिल्हा परिषदेची नवी रचना
जिल्हा परिषद सदस्य ७३
पंचायत समिती सदस्य १४६
वगळलेले प्रभाग – २
वगळलेले गट – ४
नवीन वाढवलेले गट +५ (जुन्नर, खेड, भोर, दौंड, इंदापूर)
नवीन ग्रामीण लोकसंख्या ३३.८८ लाख

 

PMC आणि PCMC मध्येही प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांमध्येही चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. नगरविकास विभागाने यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. राज्यभरातील सर्व महापालिका व नगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे.

 

 

आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

या रचनेनंतर पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरीकरण आणि लोकसंख्येच्या बदलत्या आकडेवारीनुसार घेण्यात आलेला हा निर्णय जिल्हा परिषदेमधील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणार आहे. नव्या रचनेनुसार पक्षांचे गणितही बदलणार असल्याने निवडणुकीपूर्वी विविध राजकीय हालचालींना गती मिळणार आहे. दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांनीही तयारी सुरु केली आहे. (pune jilha parishad 73 sadasya rachana 2025)

Local ad 1