पुणे–जम्मू तवी जेलम एक्सप्रेस ठप्प | कठुआ – मढेपुर पुलावरील विसंगतीमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
पुणे (प्रतिनिधी) – पुणे–जम्मू तवी दरम्यान धावणारी जेलम एक्सप्रेस मागील काही दिवसांपासून रद्द आहे. जम्मू विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. कठुआ –मढेपुर सेक्शनमधील एका रेल्वे पुलावर पटर्यांमध्ये झालेली विसंगती (misalignment) आढळल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक रद्द किंवा आंशिक स्वरूपात रोखण्यात आले असून, त्यात जेलम एक्सप्रेसचाही समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रभावित पायाभूत सुविधांची दुरुस्ती युद्धस्तरावर सुरू केली आहे. सुरक्षा सर्वोपरि असल्याने, संरचना पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच गाड्यांचे नियोजन पुन्हा सुरू होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांना, विशेषतः पुण्यातून जम्मूकडे जाणाऱ्या सेना जवानांना गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून, परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रवाशांना त्यांच्या प्रवासापूर्वी रेल्वेची अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनवर माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवे आरक्षण ; 2002 पासूनची चक्राकार पद्धत संपुष्टात