...

पुण्यात 2 च अनधिकृत होर्डिंग ? आयुक्तांनाच नाही विश्वास ; तुम्हांला विश्वास आहे का ?

विशेष पथकाकडून पुन्हा सर्वेक्षणाचे आदेश

पुणे, शहरातील रस्ते, चौक, पदपथांवर अनधिकृत होर्डिंग्जची भरमार असतानाही पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने केवळ २४ अनधिकृत होर्डिंग असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली.  या आकडेवारी इतकी अविश्वसनीय ठरली की महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनाही तिच्यावर विश्वास ठेवता आला नाही. त्यांनी या माहितीवर नाराजी व्यक्त करत, स्वतंत्र विशेष पथक तयार करून शहरभर नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश या पुर्वीच दिले आहेत.  दरम्यान, पुणे महापालिका प्रशासनाने अनधिकृत २४ होर्डिंग्जपैकी २२ वर कारवाई केल्याचा आणि केवळ दोनच उरल्याचा दावा केला आहे.

 

 

पुण्यातील पूररेषा लागू करण्याची याचिका फेटाळली ; अहवालानंतरच होणार अंतिम निर्णय

 

क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ

शहरातील क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त मात्र आपल्या हद्दीत अनधिकृत होर्डिंग्जची अचूक संख्या लेखी स्वरूपात आणि स्वाक्षरीसह देण्यास तयार नाहीत. आयुक्तांनी याबाबत तातडीने कारवाईचे आदेश दिले असतानाही पंधरा दिवसांनंतरही एकाही अधिकाऱ्याने अधिकृत अहवाल सादर केलेला नाही. यामुळे प्रशासनातील साटेलोटे आणि अनधिकृत होर्डिंगधारकांना मिळणारा अभय यावर संशय वाढत आहे.

 

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी : मिळकतकरात सवलत मिळविण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ

 

न्यायालयात प्रकरणं..

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, उर्वरित ५ होर्डिंग प्रकरणं न्यायप्रविष्ट होती. त्यातील ३ प्रकरणांवरील स्थगिती आदेश नुकतेच हटवले गेले असून ती होर्डिंग्स हटवण्यात आली. उरलेल्या २ अनधिकृत होर्डिंग्ससंदर्भात पुढील कारवाईचा दावा करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्स दिसत असताना केवळ दोनच उरलीत, हा दावा हास्यास्पद ठरतो.

 

उपायुक्त स्वतः करणार पाहणी

या पार्श्वभूमीवर, आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी ज्या क्षेत्रीय कार्यालयांनी ‘शून्य अनधिकृत होर्डिंग’ असल्याचा दावा केला आहे, त्या भागांमध्ये स्वतः पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाकडून संबंधित सहाय्यक आयुक्तांना खुलासा मागवण्यात आला असून आठवड्यापासून तेही प्रलंबित आहेत.

Local ad 1