...

Pune Grand Challenge 2026। पुण्यातील रस्त्यांची राइड क्वालिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार

पुणे महापालिकेचा दावा : पुणे ग्रँड चॅलेंज २०२६ स्पर्धेतील चार टप्प्यांसाठी चार ठेकेदार काम करणार

Pune Grand Challenge 2026। पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज २०२६ (Grand Challenge 2026) या सायकल स्पर्धेचा मार्ग पुणे शहरातून ५५ किमी तर पुणे कॅन्टोन्मेंट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा असा एकूण ७५ किमी मार्गांचे नूतणीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका सुमारे १४५ कोटी रुपये खर्च करणार आहे. ही कामे चार टप्प्यात विभागली आहेत. पुढील दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्यासाठी एका ठेकेदाराला एक टप्पा अशा पद्धतीने काम दिले जाणार आहे. पुण्यातील रस्त्यांची राई क्वालिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार आहे, असा दावा पुणे महापालिकेच पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 

pune rajiv gandhi zoo। राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅन तयार करा :  नवल किशोर राम

 

 

राष्ट्रीय पातळीवरील पुणे ग्रँड चॅलेंज २०२६ ही सायकल स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी २०२६ मध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. पुणे महापालिका पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ अंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाने पुनर्विकास व सौंदर्यीकरण करणार आहे. या प्रकल्पात एकूण ७५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे नूतणीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १४५ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार असून या प्रकल्पामुळे पुण्यातील रस्त्यांची राइड क्वालिटी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारेल, असा दावा पुणे महापालिकेने केला आहे.

 

 

शिष्यवृत्ती प्रक्रियेत मोठा बदल ; दिव्यांग विद्यार्थ्यांना थेट DBT मार्फत होणार लाभ, परंतु… 

 

चार पॅकेज, चार दिशांतील काम

पॅकेज १ : ९.६७ किमी रस्ते सुधारणा :- खर्च सुमारे ३० कोटी ८० लाख रुपये.
पॅकेज २ : २८.५३ किमी रस्ते (पुणे विद्यापीठ चौक, औंध, राजीव गांधी पूल, एफसी रोड, जेएम रोड, नाल स्टॉप इ.) :- खर्च ३२ कोटी ६७ लाख रुपये.
पॅकेज ३ : १४.३२ किमी रस्ते (शास्त्री रोड, तिलक रोड, बाजीराव रोड, नेहरू रोड, स्टेशन रोड आदी) :- खर्च ३८ कोटी २२ लाख रुपये.
पॅकेज ४ : २२.४७ किमी रस्ते (ईस्ट स्ट्रीट, पुलगेट, गुलाबी मैदान, लुल्ला नगर ते येवलेवाडी-बोपदेव घाट मार्ग) :- खर्च ४४ कोटी ५ लाख रुपये.

 

 

Diwali vacation 2025। शाळांना १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी सुट्टी

 

 

कोणती कामे केली जाणार ?

* सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स व रेलिंग्स बसविणे.
* फुटपाथ व मध्यरेषांची (मेडियन) दुरुस्ती व रंगरंगोटी.
* सर्व महत्त्वाच्या रस्त्यांचे रिसरफेसिंग व खराब भागांची दुरुस्ती.
* आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रस्ते संकेतफलक (साइनज) बसविणे.
* ४०० हून अधिक चेंबर कव्हर्स आणि ग्रेटिंग्ज बदलून रस्ता समतल केले जाईल.
* सुमारे २०० स्पीड ब्रेकर काढले जाणार आहेत. जेणेकरून वाहतूक सुरळीत व सायकलिंग स्पर्धा सुरक्षित होईल.

 

 

गुणवत्ता व वेळेवर भर

महापालिकेने ठेकेदारांसाठी काटेकोर अटी ठेवल्या आहेत. एका ठेकेदाराला केवळ एकाच पॅकेजचे काम मिळेल. काम ६० दिवसांत पूर्ण न झाल्यास दररोज ५० हजार रुपये दंड व ५ वर्षांची ब्लॅकलिस्टिंग होणार आहे. ठेकेदाराकडे १२० टीपीएच क्षमतेचा हॉटमिक्स प्लांट ३५ किमी परिघात असणे बंधनकारक आहे. तसेच २ पॅवर्स, २ बिटुमेन डिस्ट्रीब्युटर, ४ व्हायब्रेटरी रोलर्स व एक मिलिंग मशीन असणे आवश्यक आहे.

 

 

अतिरिक्त सौंदर्यीकरण

पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ अंतर्गत सायकलिंग मॅरॅथॉन आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यासाठी रस्ते मजबूत, समतल आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुरक्षित करणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी सरफेस रफनेस इंडेक्स १.५ ते २.० मी/किमी दरम्यान ठेवण्याचे बंधन आहे. या प्रकल्पाखाली मध्य पट्ट्यांचे ब्युटीफिकेशन, मार्गांवर सौंदर्यीकरण आणि ब्रँडिंगची कामे इतर विभागांमार्फत केली जाणार आहेत.

Local ad 1