baba bhide bridge । भिडे पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून बंद
डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाचा पादचारी पुलाचे काम पुन्हा सुरू
baba bhide bridge पुणे : वनाझ–रामवाडी मेट्रो मार्गावरील छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन जिमखाना स्थानकांना मध्यवर्ती पेठ भागाशी जोडण्यासाठी पादचारी पूल उभारले जात आहेत. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून (९ सप्टेंबर) पुन्हा बंद करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी उद्यान स्थानकाचा पादचारी पूल नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. तर, डेक्कन जिमखाना स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम गणेशोत्सव काळात थांबवण्यात आले होते. हा पूल मुळा नदीवरील भिडे पूलाच्या वर उभारला जात असून, पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिक व विद्यार्थी सहजतेने मेट्रो स्थानकात पोहोचू शकतील.
काम उद्या बुधवार, १० सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भिडे पूल आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, नदी पात्रातील रस्ता खुला राहणार आहे. मेट्रो प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, लकडी पूल, बालगंधर्व पूल व झेड ब्रिज या पर्यायी पूलांचा वापर करावा. पादचारी पूल शक्य तितक्या लवकर पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
—
baba bhide bridge, भिडे पूल वाहतूक बंद, डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक, पुणे मेट्रो पादचारी पूल, पुणे वाहतूक अपडेट, वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्ग, पुणे मेट्रो बातम्या
—
पुणेतील भिडे पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पूलाचे काम पुन्हा सुरू होणार असून नागरिकांनी पर्यायी पूलांचा वापर करावा, असे मेट्रो प्रशासनाचे आवाहन.