...

स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये पुण्याचा कितवा नंबर असेल ?

पुणे : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील १३० शहरांमध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये पुण्याने तब्बल १३ स्थानांची झेप घेत १० वा क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षी पुणे २३ व्या स्थानावर होते. मात्र तज्ज्ञांच्या मते, शहरातील वास्तविक वायुप्रदूषण स्थिती अजूनही गंभीर आहे.

 

महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत

हे सर्वेक्षण एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत शहरातील हवेच्या गुणवत्तेवर आधारित होते. यामध्ये बायोमास व कचरा जाळल्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याचे प्रय़त्न करण्यात आले. रस्त्यावरील धूळ व बांधकाम राडारोडा कमी केले.  वाहनांचे व औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिले. सर्व नवीन व भाडेतत्त्वावरील वाहने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित केले आहे.  जुलै २०२५ पर्यंत शहरातील ४१ लाख १६ हजार ३१० वाहनांपैकी फक्त ९५ हजार इलेक्ट्रिक आहेत. ७०% रस्ते ग्रीन बेल्ट वर्गातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.  घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केले आहेत.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत पुणे महानगरपालिकेला ३११ कोटी रुपये मिळणार असून त्यापैकी १६२ कोटी आधीच प्राप्त झाले आहेत. या निधीतून सीएनजी घंटागाड्या व पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करण्यात आले आहे.  स्मशानभूमीत गॅस व विद्युत दाहिनी बसवली आहे.  लाकडी दाहीनीत प्रदूषण कमी करण्यासाठी APC सिस्टम बसविण्यात आली.

 

राज्य शासनाच्या विभागांची ‘दादागिरी’ ; पुणे महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले

“महापालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पुण्याने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळवले आहे. मात्र प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे,” असे महापालिकेचे उपआयुक्त (पर्यावरण विभाग) संतोष वारुळे यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील पर्यावरण भवन येथे मंगळवारी झालेल्या समारंभात स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ चे निकाल जाहीर करण्यात आले. हे सर्वेक्षण केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत घेण्यात आले.

या सर्वेक्षणात देशातील १२० हून अधिक शहरांची हवेची गुणवत्ता, प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, जनजागृती व सार्वजनिक सहभाग यांचा विचार करून क्रमवारी देण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे कॅन्टोनमेंट या परिसरांचा एकत्रित आढावा घेऊन पुणे शहराचे मूल्यांकन करण्यात आले.

२०२३ च्या सर्वेक्षणात पुणे २९व्या स्थानावर होते, तर २०२४ मध्ये २३व्या क्रमांकावर आले. मात्र यंदा पुण्याने लक्षणीय झेप घेत देशातील अव्वल दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.

पुरस्कार तीन गटात विभागले
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ साठी पुरस्कारांचे तीन गट करण्यात आले होते :
१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे – या गटात ४७ शहरे सहभागी होती. त्यामध्ये पुण्याने १०वे स्थान पटकावले.
३ लाख ते १० लाख लोकसंख्या असलेली शहरे – या गटात ४४ शहरे होती.
३ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे – या गटात ४० शहरे सहभागी झाली.

Local ad 1