PSI Success Story । सालगड्याचा पोरगा पीएसआय झाला अन् गावकऱ्यांनी काढली गावात मिरवणूक

पुण्यात मिळेल ते काम करुन अभ्यास केला अन् पहिल्या प्रयत्नात पीएसआय झाला (PSI in the first attempt)

 PSI Success Story कंधार : शिक्षण घेतल्यानंतर काय होतं, हे आजपर्यंत अनेकांच्या यशातून सिद्ध झालं आहे. त्यावर पुन्हा एकदा दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परिक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदावर भरती होऊन शिक्कामोर्तब केला आहे. (Salgadya became Porga PSI and the villagers took out a procession to welcome them)

 

कंधार तालुक्यातील राऊतखेडा या छोट्याशा गावातील माधव लोकडू गर्जे (PSI Madhav Lokdu Garje) या तरुणाने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

 

माधाव याचे वडील लोकडू गर्जे हे गावातच एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करतात घरची शेती कमी असल्यामुळे लहानपणापासून लोकांच्या शेतीत काम करून आपल्या मुलांना त्यांनी योग्य शिक्षण आणि संस्कार दिले. माधवचे प्राथमिक शिक्षण राऊतखेडा येथे तर माध्यमिक शिक्षण कमळेवाडी तालुका मुखेड येथील वस्तीगृहात राहून पूर्ण केले. शिक्षणाची ओढ असल्याने माधव यांनी दहावीनंतर पॉलिटेक्निक कॉलेज छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण संगमनेर येथे पूर्ण केले.

 

 

 

आयुष्यात काही बद्दल करायचा यासाठी तो सतत प्रयत्न करत असे माधव गावाकडे आला की, वडिलांना मदत व्हावी यासाठी तो शेतात काम करायचा. वडीलाचे कबाड कष्ट डोळ्यासमोर ठेवून माधवने आपल्या वडिलांना उतार वयात तरी चांगले दिवस यावे, यासाठी दिवस-रात्र मेहनत करून यशाला गवसणी घातली आहे. पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक (PSI in the first attempt) पदावर नियुक्ती मिळवली आहे.

माझ्या घराकडील परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे मी पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळेल ते काम करून अभ्यास करत होतो. २०२० मध्ये पीएसआय पदाचे सर्व टप्पे यशस्वी पार करून आज पीएसआय झालो. या माझ्या यशात आई-वडील,भाऊ,बहीण -भाऊजी व मित्राचा फार मोठा वाटा आहे. माझ्या यशाचे श्रेय मी त्यांना देतो.
– माधव गर्जे, पोलिस उपनिरीक्षक

Local ad 1