‘Code Blue’ team। ससूनमध्ये उपचारासाठी आता  ‘कोड ब्लू’ टीम

‘Code Blue’ team । पुणे : ससून रुग्णालयात आलेल्या अत्यवस्थ रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची ‘ब्लू कोड टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. असे स्वतंत्र पथक नियुक्त करणारे बी.जे. मेडिकल कॉलेज (B.J.Medical College) राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) आणि  रुग्णालय ठरले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Director of Sassoon Sarvopachar Hospital Dr. Sanjeev Thakur) यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. (‘Code Blue’ team now for treatment in Sassoon)

 

 

अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यानंतर किंवा ससून रुग्णालाय परिसरात तातडीचे उपचार पथकातील डाॅक्टर करणार आहेत. रुग्णांना स्ट्रेचरवर घेऊन आयसीयू बेड उपलब्ध आहे की नाही, हे पाहून तिथवर रुग्णाला घेऊन पोहोचेपर्यंत रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णाला तातडीने जागेवर उपचार दिला जाणार आहेत.

 

‘कोड ब्लू’ टीमकोणाचा समावेश असेल ?

रुग्णांना ससूनमध्ये दाखल झाल्यापासून पाच मिनिटांत वैद्यकीय मदत देण्यासाठी ’कोड ब्लू’ टीम तयार करण्यात आली. यामध्ये तीन इंटेन्सिव्हिस्ट Intensivist (अतिदक्षता विभागतज्ञ), तीन डॉक्टर आणि सहा परिचारिकांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात तसेच प्रत्येक मजल्यावर ‘कोड ब्लू’ टीमचा संपर्क क्रमांक लावण्यात आला आहे.

कोड ब्लू टीम म्हणजे काय? 

रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचे ह्रदय अचानक बंद पडणे, श्वासोच्छवास थांबणे किंवा शुध्द हरपणे अशी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे प्राण वाचवण्यासाठी पाच मिनिटांमध्ये अति तत्पर उपचार पुरवणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमला ‘कोड ब्लू’ टीम म्हणून ओळखले जाते.

नाडी बंद पडणे, ह्रदय बंद पडणे, श्वासोच्छवास थांबणे अशा परिस्थितीत आपत्कालीन उपचार पुरवून रुग्णांचा जीव वाचवता येईल. मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल. एखाद्या कक्षामध्ये घोषित करण्यात आल्यानंतर दोन मिनिटात कोड ब्लू टीम रुग्णाचा ताबा घेऊन उपचार करतील.
– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे.

Local ad 1