दिव्यांगांच्या विभागासाठी ११४३ कोटीची तरतूद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केली.  त्यासाठी २ हजार ६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून, १ हजार १४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. (Provision of 1143 crores for the Department of Disabled : Chief Minister Eknath Shinde)

 

 

 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दीक्षांत सभागृहात राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister for Women and Child Development Mangal Prabhat Lodha), आमदार बच्चू कडू, यामिनी जाधव (MLAs Bachu Kadu, Yamini Jadhav), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Chief Secretary Manukumar Srivastava), सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे (Sumanta Bhange, Secretary, Department of Social Justice), बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये (BARTI Director General Dhamma Jyoti Gajbhiye) उपस्थित होते. (Provision of 1143 crores for the Department of Disabled : Chief Minister Eknath Shinde)

 

 

 

 शिंदे म्हणाले, आपले राज्य हे सर्वं सामान्यांच्या हितासाठीचे राज्य आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय (Ministry of Disability) असावे अशी सगळ्यांची भावना होती. या राज्यात लोकांच्या हिताचेच निर्णय होणार आहेत. आज दिव्यांगांसाठी सोन्याचा दिवस असून स्वतंत्र  विभाग अस्तित्वात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी कुठलाही संघर्ष न करता हे स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. (Provision of 1143 crores for the Department of Disabled : Chief Minister Eknath Shinde)

 

 

 

 स्वतंत्र मंत्रालयासाठी सचिव दर्जाचे अधिकारी  असतील. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळं हे मंत्रालय करेल. कुठलंही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचं मत सुद्धा जाणून घेतले जाईल. हा निर्णय फक्त २४ दिवसात झाला आहे. दिव्यांग मंत्रालय आपण स्थापन केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा दिव्यांगा बद्दल तळमळ होती. केंद्र सरकार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केलं आहे की, या मंत्रालयासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

Local ad 1