पुणे आकाशवाणी केंद्रावरुन ऐकायला येणाऱ्या बातम्या बंद

पुणे :  राज्यातील श्रोते असलेल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग (Regional News Section of Akashvani Pune Centre) बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने (Prasarbharti) घेतला आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याच्या कारणावरून पुणे केंद्रावरुन सकाळी प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातम्या 19 जूनपासून छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहेत, अशी माहिती प्रसारभारतीच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आली. (Now the news from Pune Akashvani Kendra will stop)

 

 

 

विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम देखील आता बंद होणार आहेत. या निर्णयामागे कारण देताना प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घ काळापासून उपलब्ध नसल्याने पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे औरंगाबादला सोपवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. (Now the news from Pune Akashvani Kendra will stop)

 

 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दर वर्षी भरती केली जाते. त्यामधूनच आयआयएस अर्थात भारतीय माहिती प्रसारण अधिकारी यांची निवड होते. याच प्रक्रियेतून आकाशवाणीसाठी आयएएस अधिका-याची नेमणूक करणे शक्य आहे. मात्र, तसा निर्णय न घेता थेट केंद्रच बंद करण्याचा घाट घालून शासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Now the news from Pune Akashvani Kendra will stop)

 

कोरोना काळात तसेच आकाशवाणी मुंबईवरील हंगामी कर्मचार्‍यांच्या आंदोलन काळात पुणे वृत्त विभागाने सर्व बातमीपत्रे उत्तमरीत्या प्रसारित केली. याबद्दल आकाशवाणी वृत्तसेवा विभागाने पुणे विभागाचा गौरव केला होता. अशा वेळी मनुष्यबळाची अडचण पुढे करत शासनातर्फे विसंगत निर्णय घेतला जात असून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

 

माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी  पुण्यासाठी एवढे तरी करावे : मोहन जोशी

 आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेऊन पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नष्ट करण्याचे धोरण आखले आहे, असे दिसून येत आहे. अशा वेळी माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असणारे ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांना पुण्याबद्दल आकस नसेल तर किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रयत्न करून हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. जर हा निर्णय केंद्र शासनाने रद्द केला नाही तर कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र निदर्शने केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पुण्याबद्दलचा आकस स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे पुणेकरांनी आता संघटित होऊन भाजपचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. तसेच शिवाजीनगर येथे भव्य मेट्रो स्टेशन होत असल्यामुळे पुणे आकाशवाणीच्या सुमारे ४ एकर जागेवर बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुल होण्यासही विरोध केला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हंटले आहे.

Local ad 1