बार्टी घडवतेय आयएएस : आता 300 विद्यार्थ्यांना मिळणार दिल्लीत युपीएससीचे प्रशिक्षण

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) (UPSC) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील (Scheduled Castes) 200 विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून त्यामध्ये 100 ने वाढ करुन आता  2022-23 या वर्षापासून 300 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. (Now 300 students will get UPSC training in Delhi)

 

तुम्ही शिक्षक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची.. बदल्या कशा होणार जाणून घ्या..

 

UPSC Exam Preparation

बार्टीमार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी (UPSC Exam Preparation) करणार्‍या 300 विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस देण्यात येणारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा 2 हजार रुपये दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य 3 हजार रुपये आणि सुरुवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता 5 हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रक्कम रुपये 5 हजार प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.   (Now 300 students will get UPSC training in Delhi)

 

खरीप हंगामात पेरणी कधी करावी?, याविषयी राज्याच्या कृषी विभागाने दिली माहिती

मागील दोन वर्षात टाळेबंदीच्या काळातदेखील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. बार्टीचे 2020 साली 9 तर 2021 साली 7 उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.   (Now 300 students will get UPSC training in Delhi)

 

आंतरजातीय विवाह केल्यास मिळतो अर्थसाह्य, पण ते कोणाला जाणून घ्या..

 

  • प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या   https://barti.in    या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.   (Now 300 students will get UPSC training in Delhi)
Local ad 1