Monsoon Update । अखेर राज्यात नैऋत्य मान्सूनचे रविवारी आगमन

Monsoon Update : नैऋत्य मान्सूनचे रविवारी (sunday) आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग अन् दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भागात मान्सून दाखल झाला आहे.

Monsoon Update : नैऋत्य मान्सूनचे रविवारी (sunday) आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग अन् दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भागात मान्सून दाखल झाला आहे, (Monsoon Update. Arrival of Southwest Monsoon in the state on Sunday) अशी माहिती पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यानी ट्विट करुन दिली आहे.

 

नैऋत्य मान्सूनचे 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा,कर्नाटक, तामीळनाडू अन् आंध्रप्रदेशचा‌ काही भाग मान्सूनने व्यापला आहे, असे होसाळीकर यांनी ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रतिक्षा होती. राज्यात मान्सून आल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. केरळमध्ये ८ जून रोजी मान्सून दाखल झााले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल झाला आहे.

 

 

शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे पूर्ण करावीत. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा दिला होता. किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किलोमिटरने वारे वाहण्याची शक्यता आहे. आता मान्सून दाखल झाला आहे. ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली.

Local ad 1