मुंबई : भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये पुढील 24 तसांत म्हणजेच 3 जूनला पोहचणार असल्याची माहिती दिली. यापुर्वी एक जूनला मान्सून येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. (Weather Alert) परंतु वाऱ्याचा प्रवाह सक्रीय नसल्याने केरळमधील मान्सूनचे आगमन लांबले होते.
हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जूनला पोहोचणार असल्याचे सांगितले होते. यास आणि तोक्ते चक्रीवादळाच्या परिणामामुळे 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल, अला अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मान्सून केरळात दाखल झाला की, नाही हे घोषित करण्यासाठी काही निकष भारतीय हवामान विभागाने निश्चित केले आहेत. (Weather Alert)