Monsoon tourism। पावसाळ्यात ट्रेकला जाताय अशी करा तयारी !

पावसाळा सुरू झाला असून, आता पावसाळी पर्यटनाकडे आपोआप पाय वळतात. मात्र, आपण ज्या ठिकाणी जात आहोत, त्या परिसराची माहिती नसते. त्यामुळे पर्यटक अडचणीत सापडतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी जाताना काय काळजी घेतली पाहिजे, सोबत कोणत्या वस्तू असल्या पाहिजे हे जाणून घ्या.. (Monsoon tourism. Be careful while trekking in monsoon)

 

पावसाळ्यातील ट्रेक करताना ‘ही’ घ्या काळजी । Be careful while trekking in monsoon

 

  • ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबत ट्रेकला जाव.
  • ट्रेक मधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी.
  • ग्रुपकडे First Aid चे साहित्य असावे.
  • ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ग्रुप यांची माहिती घरी/जवळच्या व्यक्तीस द्यावी.
  • ट्रेक मध्ये First man व Last man यांच्या मध्येच चालावे.
  • ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावी.
  • आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.
  • पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे.
  • पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी.
  • किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो.
  • walking stick सोबत ठेवावी, त्यामुळे मुळे चढणे, उतरणे व चालणे सोपं होतं.
  • शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे.
  • आपतकालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा.
  • अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.
  • शहरी गोंगाट या ठिकाणी करू नये.
  • किल्ल्यावर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नका. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा.
  • पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये.
  • धबधब्याच्या प्रपात सोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.
  • डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
  • गर्दीची ठिकाणे टाळावीत.
  • आयत्यावेळी ट्रेकमध्ये बदल केला तर त्याबद्दल संबंधितांना कळवा.
  • ट्रेक संपल्यावर सगळे घरी पोहचले आहेत याची खात्री करा.
  • सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे. आपत्कालीन स्थितीत त्याचा उपयोग होतो.
  • सोबत असणारे सर्व साहित्य प्लास्टिक बॅगमध्ये टाकून चांगले पॅक करून सॅक मधे टाकावे. ते ओले होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • काही दुर्घटना घडल्यास ७६२० २३० २३१ या २४x७ हेल्पलाईन नंबरवर आपत्कालीन संपर्क साधावा.
Local ad 1