महावितरणचा गलथान कारभार ; दहा दिवसांपासून कौठा गाव अंधारात (Mhavitaran)

कंधार : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, महावितरणच्या (Mhavitaran) मनमानी कारभारामुळे विजेचा लपंगडाव सुरु आहे. कंधार तालुक्यातील कौठा गाव गेल्या अकरा दिवसांपासून अंधारात आहे. (Kautha village in Kandhar taluka has been in darkness for the last eleven days) महावितरणचे अधिकारी भेटत नाहीत, भेटले तर उडवा-उडवीचे उत्तर देत आहेत. महावितरचे वरिष्ठ अधिकारकी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अंधारात दिवस काढावे लागत आहेत. (MSEDCL’s Golthan Karbhar; Kautha village has been in darkness for ten days)

 

 

महावितरणच्या (Mhavitaran) दुर्लक्षामुळे कौठा गावात गेल्या १० दिवसांत विज पुरवठा बंद चालु होत असल्याने  ८ रोहित्र जळाले आहेत. या मोठा परिणाम गावच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. भर पावसाळ्यात नागरिकाना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास असल्याने पाणी पुरवठा योजना खोळबंली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांची उडवा उडवी तीन दिवसात नविन डिपी बसावतो म्हणारे अधिकारी डिपी कधी येणार विचारताच उडवा उडवीचे उत्तर देत आहेत. लोकप्रतीनीधी सुध्दा याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावांतील कार्यकर्त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

महावितरणचे (Mhavitaran) स्थानिक अधिकारी उडवा-उडवीचे उत्तर देत आहेत. म्हणून कार्यकर्त्यांनी नांदेड येथील महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याशी सपंर्क केला. परंतु त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. सिगल फेज रोहित्रची सध्या टंचाई असुन प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध होईल, असे सांगून त्यांनीही हात वर केले आहेत.

       मुखेड येथील १३२  केव्हीतून गावास विज पुरवठा केला जात आहे. याची सुरुवात झाल्यापासूनच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.   गावातील २४ पैकी ८ सिगल फेस डि पी जळाले आहेत. उर्वरित १३ डि पी वर गावचा ताण येत असल्याने विज सतत चालू बंद होत आहे. तात्काळ विज पुरवठा सुरोळीत करवा, अशी मागणी करणारे निवेदन कार्यकारी अभियांता नादेड दिले आहे.
– अर्चना शिवकुमार देशमुख, सरसपंच, कौठा, ता. कंधार
Local ad 1