...

Mhada Lottery 2025 Pune : परवडणाऱ्या सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2.0 अंतर्गत नवीन प्रकल्प

MHADA पुणे 2025 घर नोंदणी प्रक्रिया । पुणे 18 जून 2025 : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनांमधून सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम, 1981 व म्हाडा अधिनियम, 1981 अंतर्गत हे वितरण करण्यात येणार आहे. या योजनांतर्गत 52 अनिवासी गाळे व 28 कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, आरक्षण, अटी व शर्ती यासंबंधीची माहिती www.eauction.mhada.gov.in आणि www.mhada.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. (mhada lottery 2025 pune registration online)

Video। कुंडमळा पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार 


सोडतीनंतर रिक्त राहिलेल्या सदनिकांसाठीही अर्ज सुरू

पुणे मंडळाच्या 15% सामाजिक गृहनिर्माण व 20% सर्वसमावेशक योजनांमध्ये सोडतीनंतर मागणी अभावी रिक्त राहिलेल्या सदनिकांचा विकसकांकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्या सदनिकांचे वितरण “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर करण्यात येणार आहे. सदनिकांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे. रिक्त सदनिका उपलब्ध होताच, त्या तात्काळ पात्र अर्जदारांना वितरित करण्यात येतील. त्यामुळे पात्र व गरजू नागरिकांनी नोंदणी करून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील धोकादायक पूल काढून टाका


प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2.0 अंतर्गत नवीन प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 नोव्हेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने देखील या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. MHADA पुणेमार्फत या योजनेंतर्गत परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत सदनिकांसाठी पात्र नागरिकांनी https://pmaymis.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.


वितरण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक

संपूर्ण अर्ज प्रक्रिया व वितरण पूर्णतः ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. देकारपत्रे (Allotment Letters) डिजिटल स्वाक्षरीसह लाभार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिली जातील. कोणतेही हस्तलिखित देकारपत्र किंवा रबरी शिक्क्याचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.

Local ad 1