...

मावळात भीषण दुर्घटना : कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक नदीत पडल्याची भीती ?

मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची होती गर्दी

मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे रविवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील जुना पूल अचानक कोसळल्याने अंदाजे २५ ते ३० पर्यटक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (mawal kundmala pool kosalla 30 parytak bepatta)

 

 

*PMC निवडणूक 2025 : नवीन प्रभाग रचना, नगरसेवकांच्या जागा कमी, दिवाळीनंतर मतदान?*👇👇
https://www.mhtimes.in/pune-mahapalika-nivadnuk-2025-prabhag-rachana/

 

ही घटना तळेगाव दाभाडे शहराजवळ घडली. रविवार असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. काही पर्यटक पुलावर थांबले असताना अचानक पूल कोसळला आणि अनेकजण थेट नदीच्या प्रवाहात वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (mawal kundmala pool kosalla 30 parytak bepatta)

 

 

mawal kundmala pool kosalla 30 parytak bepatta
mawal kundmala pool kosalla 30 parytak bepatta

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने अडथळे निर्माण होत आहेत.

 

 

दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. अजूनही किती लोक बेपत्ता आहेत याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी प्रशासन सतर्क झाले असून हातातोंडाशी आलेले पावसाळी पर्यटन धोक्यात आले आहे.

Local ad 1