(Vaccination of Tourism Corporation staff) पर्यटन महामंडळाच्या पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण 

पुणे :  कोरोना पासुन सावरण्याच्या तयारीत असताना पुन्हा कोरोना व्हायरसचा नवा विषाणुची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणामुळे कोरोनावर मात करणे शकय झााले आहे. महामंडळाच्या पर्यटक निवासातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. (Vaccination of Tourism Corporation staff in tourist accommodation)

कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. जवळपास पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पुर्ण झाले असुन आज अखेर एकही कोरोना बाधीत महामंडळाच्या पर्यटक निवासात निदर्शनास आलेला नाही. (Vaccination of Tourism Corporation staff in tourist accommodation)

पर्यटक निवासे आणि उपहारगृहे यांचे नव्याने निर्जंतुकिरण करण्यात आले आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्याबरोबरच  शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Vaccination of Tourism Corporation staff in tourist accommodation)

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतरही कंपन्यांकडुन नव्याने “वर्क फ्रॉम होम” जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी ) पर्यटनस्थ्‍ळावरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय झोन सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम’ च्या धर्तीवर “वर्क फ्रॉम नेचर”  आणि “वर्क विथ नेचर” अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थ्‍ळावरून काम करीत पर्यटनाचा आनंद व्दिगुणि‍त करीत आहेत. टप्प्याटप्प्याने राज्याभरातील ‘एमटीडीसी’ च्या सर्व रिसॉर्टवर अशी सुविधा होणार आहे. (Vaccination of Tourism Corporation staff in tourist accommodation)

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखादया पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे झाली आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा होईल. तथापि, पर्यटकांना कोरोना ची धास्ती न घेता महामंडळाच्या पर्यटक निवासात यावे. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसुन येईल. (Vaccination of Tourism Corporation staff in tourist accommodation)

-दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे’.

Vaccination of Tourism Corporation staff in tourist accommodation
Local ad 1