पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेटस, देवेंद्र फडणवीसांनी केली “ही” घोषणा

मुंबई : रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant warise) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.  (Major updates in the death case of journalist Shashikant Warise)

 

वारिसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय. तसेच यामागील मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्या, अशी मागणी ही जोर धरत आहे.

 

पोलीस विभागातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  (Major updates in the death case of journalist Shashikant Warise)

 

 

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या गाडीला सोमवारी रात्री भरधाव गाडीने धडक दिले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. दुसऱ्या दिवशी ७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात बातमी दिल्याने वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नाणार विरोधी संघटनांनी केला आहे. बुधवारी पोलिसांनी गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  (Major updates in the death case of journalist Shashikant Warise)

 

 

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी एक पत्र लिहिले आहे. नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनीचे व्यवहार झालेत. यासंदर्भात शशिकांत वारिसे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्या भागातील काही राजकारण्यांच्या डोळ्यात ते खुपत होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे.  (Major updates in the death case of journalist Shashikant Warise)
Local ad 1