...

महायुती म्हणून निवडणुकीत यश हमखास – उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आत्मविश्वास  

शहरातील समस्यांवर उपाययोजना सुरू

पुणे. “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच एकत्रित लढवणार आणि निश्चितपणे जिंकणार आहोत,” असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (mahayuti nivadnuk 2025 eknath shinde)

 

क्रेडाई पुणे संस्थेच्या पदग्रहण समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. महायुतीतील आमदारांमध्ये निधी वाटपावरुन नाराजी असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी स्पष्ट केले की, “असे काहीही नाही. महायुती एकसंघ आहे.”

 

विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत केलेल्या कार्याचा नागरिकांनी योग्य प्रतिसाद दिला असून, आगामी स्थानिक निवडणुकांतही जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

शहरातील समस्या – उपाययोजना सुरू

पुण्यातील नाल्यांच्या सिमाभिंतीसाठी निधी अद्याप न आल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, “याबाबत कार्यवाही केली जाईल.” तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी विचारणा होताच, “महापालिका आयुक्तांना याबाबत तात्काळ उपाय करण्याच्या सूचना दिल्या असून, पुणेकरांना त्रास होऊ नये म्हणून युद्धपातळीवर काम करण्याचे आदेशही दिले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Local ad 1