महावितरणची वीजबिले आता डिजिलॉकर मध्ये उपलब्ध ; मोबाईलवरच पाहा अन् डाउनलोड करा
ग्राहकांना वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले
मुंबई | आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे जशी डिजिलॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येतात, तसेच आता महावितरणच्या वीजबिलांची नोंदही डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. (mahavitaran bill digilocker integration 2025)
PMC निवडणूक 2025 : नवीन प्रभाग रचना, नगरसेवकांच्या जागा कमी, दिवाळीनंतर मतदान?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ लिव्हिंग धोरणांतर्गत वीज ग्राहकांना डिजिटल पद्धतीने अधिकाधिक सेवा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकर प्रणालीशी समन्वय साधून ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या डिजिलॉकर ॲपमध्ये वीजबिले पाहता, डाउनलोड करता व शेअर करता येणार आहेत.
डिजिलॉकर ही केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची महत्त्वाची सेवा असून, देशातील ५२.८९ कोटी नागरिक या सेवेत सहभागी झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत ८५९ कोटीहून अधिक कागदपत्रे या ॲपमध्ये सेव्ह केलेली आहेत. डिजिलॉकरमधील दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार कायदेशीर व मूळ कागदपत्राच्या बरोबरीचे मानले जातात.
पुणे महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेसाठी पहिल्यांदाच सॅटेलाईट व गुगल अर्थचा वापर होणार
वीजबिल डिजिलॉकर पाहता येईल, त्यासाठी ग्राहकांनी ॲपमध्ये जाऊन “MSEDCL” (Mahavitaran) ही सेवा निवडावी आणि आपला वीज ग्राहक क्रमांक टाकावा. त्यानंतर दर महिन्याचा वीज बिल ऑटोमॅटिक डिजि लॉकरमध्ये दिसेल. (mahavitaran bill digilocker integration 2025)