...

महत्त्वाची बातमी: महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवांवर 13 ते 16 सप्टेंबरदरम्यान परिणाम

17 सप्टेंबरपासून सेवा सुरळीत 

नांदेड (4 सप्टेंबर) : भारत सरकारच्या अर्थमंत्रालय व वित्तीय सेवा विभागाच्या 7 एप्रिल 2025 च्या राजपत्रानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ-कोकण ग्रामीण बँक या दोन बँकांचे एकत्रीकरण होऊन 1 मे 2025 पासून संपूर्ण राज्यासाठी नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे. या एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेची कोअर बँकिंग सेवा प्रणाली महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रणालीसोबत 13 ते 16 सप्टेंबर 2025 दरम्यान एकत्रित केली जाणार आहे.

 

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर तुफान हरकती ; नागरिकांचा संताप व्यक्त

 

या कालावधीत एटीएम, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, डीबीटी, व्हीकेवायसी, आधार आधारित पेमेंट्स, धनादेश वटविणे, स्थायी सूचना व नियत आदेश यांसारख्या डिजिटल व इतर बँकिंग सेवा तात्पुरत्या खंडित किंवा विलंबित होऊ शकतात.

 

पुणे महापालिकेत 30 ते 46% कमी दरांनी निविदा ; कामाचा दर्जा धोक्यात?

 

 

बँकेने ग्राहकांना विनंती केली आहे की, या दिवसांमध्ये आवश्यक आर्थिक गरजांची पूर्वनियोजन करावे. कोणत्याही अडचणीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळ www.mahagramin.in , https://www.mahagramin.in वर भेट द्यावी. 17 सप्टेंबर 2025 पासून सर्व सेवा सुरळीत सुरु होतील, तसेच ग्राहकांना अधिक तत्पर आणि सोयीस्कर सेवा मिळतील, अशी माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नांदेड क्षेत्रीय व्यवस्थापक नरेंद्र न. खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

Local ad 1