...

Bike Taxi Service in Maharashtra।”Uber, Rapido ला परवाना ; बाईक-टॅक्सीचे दर जाहीर

महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ लागू

Bike Taxi Service in Maharashtra पुणे : महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” जाहीर करून राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेच्या भाडेदरांना मंजुरी दिली आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ७३ आणि ७४ अन्वये तसेच इतर सक्षम अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना दिनांक ४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

 

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ बँकेने जाहिर केली व्याजमाफी योजना

 

राज्य परिवहन प्राधिकरणाची २७७ वी बैठक १८ ऑगस्ट २०२५ रोजी अपर मुख्य सचिव (गृह विभाग-परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींचे राज्यभर एकसमान दर लागू राहतील. तसेच, Uber India Systems Pvt. Ltd., Roppen Transportation Services Pvt. Ltd. आणि ANO Technologies Pvt. Ltd. या कंपन्यांना ३० दिवसांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात प्राव्हिजनल लायसन्स देण्यात आले आहे. अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी लायसन्स देण्यात येईल. आता परवाना प्राप्त सर्व अॅग्रीगेटर कंपन्यांना ठरवलेल्या दरांनुसारच भाडे आकारावे लागणार आहे.

 

Heavy Rain in Pune। पुणे महापालिकेचे दावे ठरले फोल : फोटो फिचर

 

असे आहेत ठरलेले भाडेदर
* सुरुवातीचा टप्पा : १.५ किमी. = ₹१५
* पुढे प्रत्येक किमी. : ₹१०.२७

 

 

 

 

 

Local ad 1