पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला असून अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. हवामान केंद्राकडून १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, सर्वाधिक पाऊस लोणी काळभोर परिसरात तब्बल १८० मिमी, लोहगावमध्ये १२९ मिमी, तर कोंढव्यात ८५.६० मिमी इतका नोंदला गेला आहे. (Loni Kalbhor 180 MM Rainfall Pune 2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी स्पष्ट केले कुणबी प्रमाणपत्र मिळणार ?
शहरातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे काही शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर केली आहे. विशेषतः लोणीकाळभोर, कोंढवा, हडपसर भागात पावसाचा जोर अधिक असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. पुण्यात झालेल्या पावसामुळे हवामान आनंददायी झाले असून धरणसाठ्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा तुटवडा भासण्याची शक्यता नाही. मात्र, काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये १०,६११ सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करुन सकाळी १० वाजता १४,५४७ हजार क्यूसेक करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये. खबरदारी घ्यावी.
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे
विविध भागातील पावसाची नोंद
लोणी काळभोर – १८० मिमी (सर्वाधिक)
लोहगाव – १२९ मिमी
कोंढवा – ८५.६० मिमी
नागर रोड – ८१.६० मिमी
हडपसर-मुंधवा – ८१.०० मिमी
औंध-बाणेर – ७८.०० मिमी
कोथरुड – ६५.२० मिमी
कसबा पेठ – ५६.२० मिमी
खडकवासला – ५०.२० मिमी
बिबवेवाडी – ४९.४० मिमी
तुलनेने कमी पाऊस – वानवडी (१३.०० मिमी)
शिवाजीनगर-घोले रोड (२०.४० मिमी)
हवामान स्थिती
* तापमान : २४ ते २७ अंश सेल्सियस
* आर्द्रता (Humidity) : ७५ ते ९२%
* हवेचा दाब (Pressure) : सरासरी ९४१ hPa
धरणसाठ्यात भर
पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये भरघोस पाणी साठा झाला आहे.
खडकवासला धरण – ७६७७ द.घ.फु. (१०५.४२%)
वरसगाव – २०६८ द.घ.फु. (१००%)
पानशेत – १३७० द.घ.फु. (१००%)
टेमघर – २०० द.घ.फु. (१००%)
भामा धरण – ५०० द.घ.फु. (१००%)
पवना धरण – १०५.१२%
मुलशी धरण – ३१७१९ द.घ.फु. (९७.४९%)
कुकडी प्रकल्प गट – ११८४९ द.घ.फु.