Malegaon Yatra । माळेगाव यात्रेनिमित्त माळेगाव यात्रेनिमित्त दारु विक्री बंद

Malegaon Yatra । 10 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव (यात्रा) व गौडगाव येथे दारु विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी निर्गमीत केले आहेत. (Liquor sale closed on the occasion of Malegaon Yatra)

Malegaon Yatra । नांदेड : श्रीक्षेत्र माळेगाव येथील 10 जानेवारी 2024 रोजी यात्रा आहे. ही यात्रा 9 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत एकूण 7 दिवस भरते . या कालावधीत लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी 10 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव (यात्रा) व गौडगाव येथे दारु विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी निर्गमीत केले आहेत. (Liquor sale closed on the occasion of Malegaon Yatra)

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 10 जानेवारी 2024 रोजी मौ. माळेगाव (यात्रा) व मौ. गौडगाव येथील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

 

Local ad 1