कोल्हापूर–पुणे TOD विशेष गाडीच्या डब्बा रचनेत बदल ; प्रवाशांसाठी अधिक सोयी
स्पेशल ट्रेनची कोच रचना 4-5 जून 2025 पासून सुधारित होणार
पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी कोल्हापूर पुणे TOD विशेष गाडी (गाडी क्रमांक 01023/01024) याच्या डब्बा रचनेत कायमस्वरूपी बदल करण्याची घोषणा केली आहे. (kolhapur pune tod special train coach update 2025)
पुणे मनपामध्ये तब्बल ७३३६ पदे रिक्त ; कामकाजावार होतोय परिणाम !
🔹 सध्याची डब्बा रचना (14 एलएचबी डबे)
1 गार्ड केबिनसह आसन-कम-लगेज डबा, 1 जनरेटर-कम-लगेज डबा, 4 सामान्य दुसऱ्या श्रेणीचे डबे, 7 स्लीपर डबे आणि 1 एसी 3-टियर इकॉनॉमी डबा.
🔹 संशोधित डब्बा रचना (18 एलएचबी डबे)
1 गार्ड केबिनसह आसन-कम-लगेज डबा, 1 जनरेटर डबा, 4 सामान्य दुसऱ्या श्रेणीचे डबे, 7 स्लीपर डबे, 4 एसी 3-टियर डबे आणि 1 एसी 2-टियर डबा. (kolhapur pune tod special train coach update 2025)
हा बदल 4 जून 2025 रोजी कोल्हापूरहून निघणाऱ्या गाडी क्रमांक 01024 आणि 5 जून 2025 रोजी पुण्याहून निघणाऱ्या गाडी क्रमांक 01023 पासून लागू होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी. डब्ब्यांची संख्या वाढवल्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा व आसन क्षमता मिळणार आहे. – TOD विशेष गाडी