...

व्हिडीओ : कात्रज जुन्या बोगद्याजवळ धावत्या क्रेटा जळून खाक 

पुणे, ३ जुलै : साताराकडून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर कात्रज जुन्या बोगद्याजवळ एक चारचाकी वाहन (Hyundai Creta – डिझेल) अचानक पेट घेतल्याची घटना घडली. धूर आणि आगीचे लोट दिसताच आजूबाजूच्या वाहनचालकांनी तातडीने खबर दिल्यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. (katraj old tunnel car fire creta pune satara)

 

 

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

पुण्यात 2 च अनधिकृत होर्डिंग ? आयुक्तांनाच नाही विश्वास ; तुम्हांला विश्वास आहे का ?

 

वाहनातील चालक वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

Local ad 1