...

महाराष्ट्रात जिल्हा परिषद गट कुठे सर्वाधिक, कुठे कमी? तुमच्या जिल्ह्यात किती जाणून घ्या !

सात जिल्ह्यांमध्ये ६० पेक्षा अधिक गट

मुंबई | प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने गट (जिल्हा परिषद गट) रचनेचा तपशील समोर आला असून यामध्ये जिल्ह्यांनुसार गटसंख्येतील फरक स्पष्ट दिसत आहे. लोकसंख्या, भौगोलिक विस्तार आणि प्रशासनिक गरजांनुसार गटांची संख्या ठरवण्यात आली आहे. (जिल्हानिहाय गट संख्या) गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये प्रशासक राज होते. आरक्षण, प्रभाष रचना या मुद्यावर न्यायलयात याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. परंतु निवडणुका झाल्या पाहिजे, यासाठी काही जण न्यालयात गेले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांच्या आत निवडणूक घ्या, असे आदेश दिले. त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले  असून, प्रक्रिया सुरु केले आहे. जिल्हा परिषद आणि  पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. (jilha parishad gat rachana 2025 maharashtra list)

2025 ची नवी प्रभाग रचना : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय

 

PMC निवडणूक 2025 : नवीन प्रभाग रचना, नगरसेवकांच्या जागा कमी, दिवाळीनंतर मतदान?

महाराष्ट्र जिल्हा परिषद गटसंख्या

क्रमांक जिल्हा गटसंख्या
1 अहमदनगर (अहिल्यानगर) 75
2 नाशिक 74
3 पुणे 73
4 जळगाव 68
5 सोलापूर 68
6 नांदेड 65
7 सातारा 65
8 छत्रपती संभाजीनगर 63
9 यवतमाळ 62
10 सांगली 61

 

महत्त्वाची निरीक्षणे

  • लोकसंख्येचे आणि क्षेत्रफळाचे प्रमाण लक्षात घेता, पुणे, नाशिक, अहमदनगर यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये गटांची संख्या अधिक आहे.

  • कोकण व विदर्भातील सिंधुदुर्ग, गडचिरोली, वर्धा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये गटसंख्या कमी आहे.

  • राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गटांची संख्या ५० ते ५५ दरम्यान आहे, यावरून राज्य शासनाने एकसमानतेचा प्रयत्न केल्याचे दिसते.

महाराष्ट्र जिल्हा परिषद गट रचना 2025 ही केवळ लोकसंख्येवर आधारित नसून भौगोलिक, प्रशासकीय व सामाजिक घटकांचा सुद्धा विचार करून आखली गेली आहे. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यांमध्ये अधिक गट असून, लहान जिल्ह्यांमध्ये ही संख्या तुलनेने कमी आहे. या रचनेमुळे स्थानिक प्रशासनाला अधिक प्रभावीपणे सेवा पुरविता येणे शक्य होणार आहे. (jilha parishad gat rachana 2025 maharashtra list)


Local ad 1