जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा कधी होणार जाणून घ्या..

नांदेड : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा शनिवार 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळेत नांदेड जिल्ह्यातील 31 केंद्रावर घेण्यात येणार आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश निर्गमीत केले आहेत. (Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Test 2022)

 

 

 

 जिल्ह्यातील या 31 परीक्षा केंद्रावर नवोदय चाचणी परीक्षा चालू असतांना परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात प्रवेश करता येणार नाही. या कालावधीत सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 यावेळेत परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. (Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Test 2022)

 

Local ad 1