‘द लाडी मेथड’ला इनोव्हेशन पुरस्कार 

पुणे : पुणे कॅम्प (Pune Camp) येथील नेत्रतज्ज्ञ डॉ.जीवन लाडी (Ophthalmologist Dr. Jeevan Ladi) यांनी शोधलेल्या अभिनव पद्धतीला इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या (Maharashtra Ophthalmologist Association) वार्षिक परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. (Innovation Award for ‘The Ladi Method‘)

 

मोतीबिंदू शत्रक्रियेमध्ये (Cataract surgery)डोळ्यांची बघण्याची क्षमता अचूक व नैसर्गिक राहण्यासाठी लेंस बसवली जाते. त्याला लेंस इम्प्लांट, असे सुद्धा संबोधले जाते. बदलत्या राहणीमानानुसार चष्म्याचा वापर कमी करण्यासाठी तसेच सोयीस्कर असण्यासाठी एकाच वेळी लांबचे व जवळचे स्पष्ट दिसणारी मल्टीफोकल लेंस बसवून घेणे अनेकजण पसंद करतात.

 

Naib Tehsildar। अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती

सर्व व्यक्तींंमधे तसेच एकाच व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांची लेंस पॉवर भिन्न असते. अशावेळी या लेंसची पॉवर अचूक असणे गरजेचे असते. नेत्रतज्ज्ञ डॉ.जीवन लाडी यांनी अभिनव पद्धतीचा शोध लावला आहे. भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञाने हा शोध लावला आहे. प्रचलित विदेशी पद्धतीपेक्षा ही सोपी असून दहा ते बारा पटीने कमी खर्चिक आहे.

 

डॉ.लाडी ही पद्धत गेल्या 4 वर्षापासून वापरत आहेत. सर्व रुग्णांना त्याचा खूप फायदा झाला आहे. द लाडी मेथड (The Ladi Method) ही भारतीय कॉपीराइट संस्थेमध्ये बौद्धिक प्रॉपर्टी राईट्स म्हणून रजिस्टर्ड आहे. भारतीय तसेच विदेशातील अनेक नेत्रतज्ज्ञ अचूकतेमुळे या पद्धतीचा मोठ्या प्रमाणांवर वापर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

Local ad 1