बिर्याणी नाव उच्चारलं की सर्वात प्रथम डोळ्यासमोर हैदराबादी बिर्याणी (Hyderabadi Chicken Biryani) येते. मात्र, पुण्यात मिळत असलेली बिर्याणी ही हैद्राबादी बिर्याणी आहे का, हा प्रश्न सतत सतावत असतो. विशेष म्हणजे ज्यांनी हैदराबाद किंवा मराठवाड्यात बिर्याणी खाल्ली आहे. त्यांना पुण्यातील बिर्याणी ही हैदराबादी बिर्याणी नसल्याचे लक्षात येते. मात्र, आम्ही तुम्हांला हैदराबादी बिर्याणी कशी बनवतात तसेच त्याची रेसिपी काय आहे ते सांगणार आहोत. (Hyderabadi Chicken Biryani recipe)
हैदराबादी बिर्याणीची रेसिपी
५०० ग्रॅम बासमती तांदुळ, ५०० ग्रॅम चिकन, १०-१२ कांदे चिरून, 5-6 टोमॅटो, २५० ग्रॅम दही, 4-5 तमालपत्र, 7-8 लवंग, 4-5 हिरवी वेलची, 4 काड्या दालचीनी, 1 जावित्री, १२-१४ काळीमिरी, 1 टेबलस्पून शाही जिरे, 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, 1 बिर्याणी मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, 2-3 पुदिना, 3-4 कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, हळद, बार्याणी कलर आणि एक लिंबू घ्या.
Mumbai – Pune Expressway । द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार असाल तर प्रशासानाचे ‘हे’ आवाहन वाचा..
असे आहेत टप्पे..
- सर्वात आधी चिकन स्वच्छ गरम पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यावे. त्यानंतर चिकन पिसेस दही, आले लसूण पेस्ट, मीठ घालून एक तास ठेवावे. हे सर्व मसाल्यासोबत पाणी उकळून घ्या. त्यानंतर बासमती तांदळाला लागेल तेवढे पाणी घेऊन तांदूळ अर्धे कच्चे शिजवून घ्या. मात्र, त्यांना पुर्ण शिजवू देऊ नका.
- एका कढईत तूप घालून ३ तमालपत्र, शाही जिरे, उरलेले लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि विलायची परतून घ्या. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मंद गॅसवर कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्या. मग त्यात आले लसूण पेस्ट घालावे. त्यानंतर त्यात बिर्याणी मसाला, हळद, लाल मिरची पावडर एकत्र करून घ्या. आता चिरलेले टॉमॅटो, कोथिंबीर घालून सात ते आठ मिनिटे मंद आचेवर ठेवा. दही घालून त्या मसाल्यात एकजीव करून घ्यावा व पंधरा मिनिटे ते शिजवून घ्या. सगळ्यात शेवटी चिकन दह्या सोबत पाच मिनीट शिजवून घ्यावे. चिकनला उकळी येऊ देऊ नका. फक्त अर्ध शिजवून घ्या आणि गॅस बंद करा.
- आता दुसऱ्या एका पातेल्यात थर लावून घेऊ.अर्धा चिकनचे थर घेऊ, मग त्यावर भाताचा थर, त्यावर थोडे तूप घालून मग पुन्हा चिकनचा थर मग उरलेला भात तूप आणी केशर घालून वाफेवर ठेवा. मोठा तवा गॅसवर ठेवुन त्यावर बिर्यानीचे पातेले ठेवून वीस ते पंचवीस मिनिटे वाफवून घ्यावे.