...

PMC चा महत्त्वपूर्ण निर्णय : गंगाधाम मार्ग सुरक्षिततेसाठी प्रभावी नियम प्रस्तावित

पथविभागाने पाठवले वाहतूक विभागाला केली शिफारस

पुणे .पुण्यातील गंगाधाम रस्ता हा अलीकडे अत्यंत वर्दळीचा झाला असून, दिवसेंदिवस येथे जड वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदवले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने वाहतूक विभागाकडे जड वाहनांना (जड वाहन प्रवेश बंदा) या मार्गावरून प्रवेशबंदी करण्याची अधिकृत मागणी केली आहे. पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या पत्रानुसार, गंगाधाम रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, विशेषतः कात्रज–कोंढवा रस्त्यावरून येणाऱ्या आणि मार्केट यार्ड चौकातून पुढे जाणाऱ्या जड वाहनांची संख्या मोठी आहे. (gangadham road heavy vehicles ban pmc proposal pune)

 

 

अपघाताचे कारण : तीव्र उतार व जड वाहने

  • आई माता मंदिराकडून गंगाधाम चौकात येताना रस्त्याचा उतार खूपच तीव्र आहे.
  • या उतारामुळे जड वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे, काही दुर्घटना गंभीर स्वरूपाच्या देखील होत्या.
  • रस्ता सुधारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

 

पुणे : लोणावळा-मावळ पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांनी का घेतला हा निर्णय ?

उपाययोजना प्रस्तावित

पथ विभागाने वाहतूक विभागाकडे पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत

  • सदर रस्त्यावर जड वाहनांना प्रवेशबंदीचे आदेश निर्गमित करावेत
  • आई माता मंदिराजवळ ‘हाईट बॅरियर’ बसवण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून फक्त दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनेच रस्ता वापरू शकतील . PMC प्रस्ताव

 

पुणे महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेसाठी पहिल्यांदाच सॅटेलाईट व गुगल अर्थचा वापर होणार

 

प्रशासनाकडे आग्रह

पथ विभागाच्या मते, या उपाययोजना तत्काळ राबविल्यास अपघात टाळता येतील आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळेल. यापूर्वीही अशा स्वरूपाचा पत्रव्यवहार प्रशासनाशी करण्यात आलेला आहे. (gangadham road jad vahan pravesh band pmc proposal)

निष्कर्ष

गंगाधाम रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीची कारवाई होणे गरजेचे आहे. जड वाहनांवर बंदी आणि हाईट बॅरियर बसविणे या सूचनांवर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी स्थानिक नागरिकांकडूनही मागणी आहे. गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना प्रवेशबंदीची शिफारस – पुणे महापालिकेचा प्रस्ताव

 

 

Local ad 1