...

गणेश विसर्जन 2025 : पुणे महापालिकेची तयारी पूर्ण, २ हजार कर्मचारी व हौद व्यवस्था

२ हजार स्वच्छता कर्मचारी, ३८ ठिकाणी हौद, २५८० मोबाईल टॉयलेट, जीव रक्षक व अग्निशमन दल सज्ज

पुणे, पुण्यातील दहा दिवसांचा गणेशोत्सव शनिवारी विसर्जन मिरवणुकीने संपन्न होणार असून, ही मिरवणूक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात महाराष्ट्रासह राज्याबाहेरील हजारो गणेशभक्त दाखल होत असल्याने पुणे महापालिकेने विशेष तयारी केली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन, अग्निशमन दल व जीव रक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

महत्त्वाची बातमी: महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवांवर 13 ते 16 सप्टेंबरदरम्यान परिणाम

 

👷 २ हजार स्वच्छता कर्मचारी
* मिरवणूक मार्ग व घाटांवर स्वच्छतेसाठी दोन हजार कर्मचारी तैनात.
* औषध फवारणी, कंटेनर, ग्रुप स्लीपिंग, फिरती शौचालये उपलब्ध.

 

🪔 विसर्जनासाठी हौद व लोखंडी टाक्या

* ३८ ठिकाणी ६९ बांधीव हौद
* ७ विहिरी, ४ तलाव आणि कालव्याजवळ ४१ ठिकाणी विसर्जन सोय
* शहरभरात २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या

🌿 निर्माल्य संकलन व पर्यावरणपूरक उपक्रम
* २७४ ठिकाणी ३२८ निर्माल्य कलश
* २४१ संकलन व दान केंद्रे
* ४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्र

🚨 जीव रक्षक व अग्निशमन दल
* सर्व रजा रद्द करून अग्निशमन दल सज्ज
* विसर्जन घाटांवर जवानांसह खासगी जीव रक्षक
* लाइफ जॅकेट, लाइफ बॉय व फ्लोरोसेंट जॅकेटची सोय
* नदीकिनारी आडवे दोरखंड लावून सुरक्षा वाढवली

 

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर तुफान हरकती ; नागरिकांचा संताप व्यक्त

 

🚻 स्वच्छता व शौचालये
* २५८० मोबाईल टॉयलेट
* सार्वजनिक शौचालयांची विशेष स्वच्छता
* फिरती शौचालये व सूचना फलक

🎶 स्वागत व सोयी
* टिळक चौक, माती गणपती व साहित्य परिषद येथे स्वागत मंडप
* सर्व घाटांवर खुर्च्या, टेबल, मांडव व हिरकणी कक्ष

प्रमुख विसर्जन घाट
संगम घाट, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर घाट, बाबू घाट, औंधगाव घाट, बंडगार्डन घाट, पांचाळेश्वर घाट, वारजे कर्वेनगर घाट इत्यादी ३५ घाटांवर विसर्जनाची सोय केली आहे.

मानाच्या गणपतींसाठी विशेष व्यवस्था
नटेश्वर घाट : कसबा गणपती, जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती
पांचाळेश्वर घाट : तुळशीबाग गणपती, केसरी वाडा गणपती

महापालिकेचे आवाहन
मुळा-मुठा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन महापालिकेने उभारलेल्या हौदांमध्ये व लोखंडी टाक्यांमध्येच करावे. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

आपत्कालीन संपर्क क्रमांक
* ०२०-२५५०१२६९
* ०२०-२५५०६८००/१/२/३
* १०१ (अग्निशामक दल)

 

Local ad 1