मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या प्रशासनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त करण्याकरिता ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) ने विकसित केलेल्या ‘ई कॅबिनेट’ प्रणालीचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केले. (‘E-Cabinet’ to be implemented in Maharashtra)
‘ई कॅबिनेट’ची प्रमुख वैशिष्ट्ये
आयसीटी आधारित या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी होणार आहे मंत्रिमंडळ सदस्यांसाठी सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल त्याचबरोबर संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पाईंट) पाहणे, निर्णयांचे पुनरावलोकन करणे सुलभ होईल. ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर चर्चा आणि निर्णयासाठी प्रस्ताव सादर आणि अंतिम निर्णय घेणे ही प्रक्रिया सुलभ होईल पारंपरिक बैठकींतील कागदपत्रांच्या वितरणासाठीची धावपळ कमी होईल. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि मंत्रिमंडळाचा मोठा वेळ वाचेल.