...

व्हिडीओ : पुणे भाजप शहराध्य धीरज घाटेंचा ‘वीज’ घोटाळा उघड ! ; महावितरणवर युवक काँग्रेसचा हल्लाबोल

व्यायामशाळेत १२ वर्षांपासून बिनधास्त वीजचोरीचा आरोप

पुणे | भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे महापालिकेच्या व्यायामशाळेत १२ वर्षांपासून बिनधास्त वीजचोरी केली असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. महावितरणच्या अधिकृत तपास अहवालातही घाटे यांच्यावर वीजचोरी कलम १३५ अंतर्गत सिद्ध झाली असतानाही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. (Dheeraj Ghate Electricity Theft Protest By Yuva Congress Pune)

 

 

पुण्यातील नदी सुधार प्रकल्पामुळे नैसर्गिक प्रवाह धोक्यात !

 

या पार्श्वभूमीवर रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयावर युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन करत निषेध केला. घोषणाबाजी करत महावितरणच्या पक्षपाती धोरणाचा विरोध करण्यात आला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर नोटीस देत मुक्त केले.

 

 

 

भाजपच्या नेत्यांना विशेष सवलत?

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे म्हणाले, “भाजपसाठी कायदे वेगळे आहेत का? सामान्य ग्राहकाचे वीजबिल थकले तर कनेक्शन तोडले जाते, पण भाजप नेत्यांवर कारवाई होत नाही. धीरज घाटे हे केवळ भाजपचे शहराध्यक्ष नाहीत तर भाजपच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत.”

 

dheeraj ghate electricity theft protest by yuva congress pune
dheeraj ghate electricity theft protest by yuva congress pune

 

मीडिया विभागाचे प्रदेश अध्यक्ष अक्षय जैन यांनी सांगितले, “१२ वर्ष वीजचोरी करूनही महावितरणकडून कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही, हे महावितरणच्या गुलामीचे जिवंत उदाहरण आहे. युवक काँग्रेस पक्षपाती धोरणाविरोधात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.”

 

राजकारण करा, पण मर्यादा पाळा – मस्तानी प्रकरणावर खसादार मेधा कुलकर्णींचा टोला

 

यावेळी सौरभ अमराळे, अक्षय जैन, उमेश पवार, सागर धाडवे, किशोर मारणे, प्रथमेश आबनावे, आनंदकुमार दुबे, मेघश्याम धर्मावत, राज जाधव, हर्षद हांडे, अक्षय बहिरट, सद्दाम शेख, साकिब सय्यद, ऋषीकेश वीरकर, तुषार पठारे, मतीम शेख, यश कोलते आदी कार्यकर्ते, उपस्थित होते.

 

 

Local ad 1