...

क्रेडिट कार्ड ते LPG गॅस :1 सप्टेंबरपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

एटीएम व्यवहारांसंदर्भातील नवे नियम लागू होणार

एमएच टाइम्स डेक्स : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नवे नियम लागू होतात आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. येत्या 1 सप्टेंबर 2025 पासून क्रेडिट कार्ड, चांदीची हॉलमार्किंग, एलपीजी गॅस सिलिंडर, पोस्ट ऑफिस सेवा आणि एटीएम व्यवहारांसंदर्भातील नवे नियम लागू होणार आहेत. जाणून घ्या याचे सविस्तर… 

 

 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवे आरक्षण ; 2002 पासूनची चक्राकार पद्धत संपुष्टात

 

 

क्रेडिट कार्ड नियम

एसबीआय (SBI) या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने त्यांच्या काही क्रेडिट कार्डसंदर्भातील नियम बदलण्याची घोषणा केली आहे. 1 सप्टेंबरपासून डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म, सरकारी पेमेंट्स आणि काही व्यापारी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. याचा थेट परिणाम क्रेडिट कार्ड धारकांवर होणार आहे.

 

चांदीच्या हॉलमार्किंगचे नियम

केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हा नियम ऐच्छिक असेल. ग्राहकांना हॉलमार्क केलेले किंवा न केलेले दागिने खरेदी करण्याचा पर्याय मिळेल.

 

पुणे–जम्मू तवी जेलम एक्सप्रेस ठप्प | कठुआ – मढेपुर पुलावरील विसंगतीमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

 

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित केल्या जातात.यावेळी 1 सप्टेंबरपासून किंमतीत वाढ किंवा घट होऊ शकते. याचबरोबर सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दरही बदलले जाऊ शकतात.

 

पोस्ट ऑफिस बदल

नोंदणीकृत पोस्ट सेवा रद्द करून ती स्पीड पोस्टमध्ये विलीन केली जाणार आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून नोंदणीकृत पोस्ट स्वतंत्र सेवा राहणार नाही. यानंतर सर्व पोस्ट स्पीड पोस्ट श्रेणीतच पाठवावी लागणार आहे.

 

एटीएम व्यवहारांबाबत नवे नियम

काही बँका एटीएम व्यवहारांसाठी नवे नियम लागू करणार आहेत. ठराविक फ्री व्यवहारांनंतर अतिरिक्त पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Local ad 1