पुण्यात कोविड-१९ रुग्णसंख्येत वाढ; PMC ची आपत्कालीन बैठक
प्रतिबंधात्मक उपायांची तयारी सुरू
पुणे : पुणे शहरात अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने (PMC) सोमवारी (९ जून) आपत्कालीन आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीचा उद्देश सध्या उद्भवलेल्या संसर्ग स्थितीचा आढावा घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाय अधिक बळकट करणे आहे. PMC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून ते ६ जून २०२५ या सहा दिवसांत शहरात ६४ नवीन कोविड-१९ रुग्ण आढळले आहेत, तर म्है महिन्यात एकूण १०८ रुग्ण नोंदवले गेले होते. या तुलनेत सध्या संसर्ग दरात वाढ दिसून येत आहे. PMC च्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पासून पुणे शहरात आतापर्यंत एकूण १३७ कोविड-१९ रुग्ण नोंदवले गेले आहेत. (covid19 pune pmc emergency meeting)
विकासकांसाठी आनंदाची बातमी; NA आणि माइनिंग परवानगी ऑनलाईन होणार!
या आढावा बैठकीस PMC चा आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, रॅपिड रिस्पॉन्स टास्क फोर्स, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), बी.जे. मेडिकल कॉलेज, तसेच खाजगी रुग्णालयांचे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. (covid19 pune pmc emergency meeting)