Constitution of India। डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने दिली नवी पहाट : प्रा.रतनलाल सोनिग्रा

पुणे : नशिबाला दोष देऊन गुलाम बनविण्याची प्रवृत्ती अद्याप नष्ट झालेली नाही. संविधानाने (Constitution of India) नवी पहाट दिली आहे, त्यामुळे संविधानाचा अभ्यास केला, तर न्यायालयात बसतो. संविधानाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रतनलाल सोनिग्रा (Senior Literature Professor Ratanlal Sonagra) यांनी व्यक्त केले.

 

 

नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये (Dr. from Nana Pethe. Babasaheb Ambedkar School) स्व. जगन्नाथ सकट समाजसेवा संस्थेच्या (Jagannath Sakat Social Service Society) वतीने संविधान रक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित सकट (Indrajit Sakat) यांनी केले होते. याप्रसंगी डीसीएम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, आसिफ शेख, संजय सकट, राजू अडागळे, राहिल मलिक, संदीप धांडोरे, अभिषेक रणदिवे उपस्थित होते.

 

यावेळी पत्रकार मोहिनी मोहिते, भूपेंद्र पाटोळे, सुनिता अडसुळे, वैशाली अवघडे, तौसिफ अब्बास शेख, मंजिरी घाडगे, सुखदेवसिंह चारण, सुरेश अवचिते, विजयालक्ष्मी भगत, डॉ. रुपाली खोब्रागडे, संजय गायकवाड, डॉ. शिवकुमार, अॅड. वंदना गायकवाड, अनिल हतागळे, अजय ससाणे, कुत्साव रॉ़ड्रीग्ज यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले, वह्या पुस्तकांबरोबर समाजातील इतरही गोष्टींचे शिक्षण घ्या, अशी शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. दर्शनापेक्षा प्रदर्शन करण्याची अलीकडे पद्धती रूढ होऊ लागली आहे, ही प्रवृत्ती समाजाला घातक ठरू पाहात आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि सुराज्य आणण्यासाठी देशाला संविधानाची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

 

कानिफनाथ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. गणेश खरात, राम कुचेकर, गणेश अहिरे, सतीश कांबळे, सूर्यकांत संकपाळ, दत्ता ढवळे, राहुल नवगिरे, इंद्रजित वाघमारे, रोहित साळवे, दिव्येश महंकाळे, रोशन केदारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Local ad 1