Nanded crime बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा गोळीबारात मृत्यू

नांदेड : शहातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) आणि त्यांच्या चालकावर गोळीबार (Firing) झाला होता. उपचार सुरू असताना बियाणी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.  (Builder Sanjay Biyani shot dead)

 

 

 

बियाणी शारदानगर येथील घराबाहेर निघताना मंगळवारीी सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची चर्चा सुरू आहे. दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. बियाणी त्यांच्यावर गोळी झाडून कोणी हल्ला केला, हे अजूनही समजलेलं नाही. बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती, मात्र तेव्हा पुरवलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती. (Builder Sanjay Biyani shot dead)

 

 

बियाणी यांच्यावर घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघा जणांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. संजय बियाणी यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा गोळीबार कुणी केला याचा शोध सुरू केला आहे. (Builder Sanjay Biyani shot dead)

Local ad 1