पुणे : IIT बॉम्बेचे माजी विद्यार्थी वैभव बाकलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या बाकलीवाल ट्युटोरियल्स (BT) ने आपला २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. JEE Main आणि Advanced परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत BT ने महाराष्ट्रातील अग्रगण्य कोचिंग संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
गेल्या दोन दशकांत BT कडून ४,००० हून अधिक विद्यार्थी घडवले असून सात वेळा सिंगल डिजिट AIR, पाच महाराष्ट्र टॉपर्स आणि दहा पुणे टॉपर्स तयार झाले आहेत. २०२५ मध्ये BT च्या आयुष चौधरीने JEE Main मध्ये अखिल भारतीय ७ वा क्रमांक पटकावला, तर ३७८ विद्यार्थी JEE Advanced साठी पात्र ठरले. मागील वर्षी BT चे १२ विद्यार्थी JEE Advanced टॉप ५०० मध्ये होते, जे पुण्यातील इतर सर्व संस्थांपेक्षा अधिक आहे.
या पार्श्वभूमीवर BT ची वार्षिक कोडी स्पर्धा Whizz-Kid 2025 ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. दोन फेऱ्यांच्या या स्पर्धेत पहिली फेरी १२ ऑक्टोबर रोजी BT च्या विविध केंद्रांवर, तर अंतिम फेरी नंतर होणार आहे. टॉप १० विजेत्यांना ₹२००० ते १५,००० दरम्यानचे Amazon गिफ्ट व्हाउचर्स, तसेच टॉप ५० विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि गिफ्ट्स दिले जाणार आहेत.
Whizz-Kid ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, विश्लेषणशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते. विशेष म्हणजे, या स्पर्धेत विचारलेली काही कोडी पुढे RMO, Technothlon सारख्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही समाविष्ट झाल्याचे सांगण्यात आले. BT च्या वतीने सांगण्यात आले की, “हा २० वर्षांचा टप्पा हा यशाचा उत्सव असला तरी पुढील प्रवासाची ही सुरुवात आहे. उच्च दर्जाचे शिक्षण, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या यश या तीन स्तंभांवर आमची बांधिलकी कायम राहील.”
Whizz-Kid 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लिक करा www.bakliwaltutorialsiit.com/whizzkid