पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी, आठवडे बाजारही सुरु होणार

पुणे : गोवंशीय तसेच गुरे म्हशींमधील अनुसूचित असलेल्या लम्पी चर्मरोगावर नियंत्रण रहावे म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाधित क्षेत्रनिहाय बैलगाडा शर्यतीस तसेच गुरांची वाहतूक करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. (Bailgada sharyat allowed in Pune district)

 

 

सर्वत्र लशीकरण करण्यात आले असून संक्रमणावर देखील नियंत्रण राखण्यात यश आले आहे, तरी उपविभागीय अधिकारी यांना कार्यक्षेत्रात पशुधन विस्तार अधिकारी यांच्या परवानगीनंतरच अटी आणि शर्तीनुसार गुरांचा बाजार भरवणे, बैलगाडा शर्यतीस तसेच गुरांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले आहेत. (Bailgada sharyat allowed in Pune district)
     राज्य शासनाच्या निर्देशानुसार लम्पी रोगासंदर्भात प्रादूर्भाव, संक्रमण आणि नियंत्रणासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत कृषी पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेअंतर्गत लसीकरण संदर्भात कार्यवाही करण्यात आली होती. (Bailgada sharyat allowed in Pune district)
जिल्ह्यात लम्पीच्या संक्रमणावर नियंत्रण राखण्यात यश आल्याने नुकत्याच पडलेल्या आढाबा बैठकीत गुरांचा बाजार आणि बैलगाडा शर्यतीस परवानग्या देण्याबाबत मागणी करण्या आली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना प्राण्यांच्या शर्यती अटी आणि शर्तीनुसार पुन्हा सुरू करण्याबाबत परिपत्रक काढून परवानगी दिली आहे. (Bailgada sharyat allowed in Pune district)

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अटनापीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून बैलगाडा शर्यतीस परवानगी देताना प्राण्यांसोबत क्रूरतेने वागणे संदर्भातील नियम, बाजार भरवतानाचे नियमांच्या अधीन राहून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाकडून वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून परवानगी द्यावी, असे देखील पत्रकाlतनमूद केले आहे. (Bailgada sharyat allowed in Pune district)

Local ad 1