औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद Aurangabad । जिल्ह्यातील अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले असून, राज्य सरकारने तत्काळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी केली आहे. (Announce wet drought in Aurangabad district : MP Imtiaz Jalil)

 

खासदार जलील (MP Imtiaz Jalil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले. औरंगाबाद जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई देण्याची मागणीही जलील यांनी केली आहे.

 

 

 औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात शेतकरी बांधवांचे खरिप हंगामाचे उभे पिक वाहून गेल्याने आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे जलील (MP Imtiaz Jalil) यांनी सांगितले. (Announce wet drought in Aurangabad district : MP Imtiaz Jalil)

 

 

नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असून कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असुन कधी न भरून निघणारे आर्थिक नुकसान झालेले आहे. (Announce wet drought in Aurangabad district : MP Imtiaz Jalil)

 

पावसान जमिनीत मोठ्या प्रमाणात तण उगवल्यामुळे रब्बीच्या पेरणीला विलंब होणार आहे, खरिपाचे उत्पन्न अद्याप हाती आलेले नाही. त्यामुळे तण काढणे, पेरणीसाठी बियाणे व खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत. जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल.

Local ad 1