...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा – आमदार रोहित पवारांचा आरोप

पुणे,  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाखाली संचालक मंडळाने गैरव्यवहार करून शेतकऱ्यांची लूट केली असून, या गैरप्रकारात अधिकारी सामील असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचेही पवार यांनी आरोप केले. 

 

पवार म्हणाले की, “बाजार समितीत शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. शासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही, तर पुढील १५ दिवसांत मोठे शेतकरी आंदोलन उभारले जाईल. हे आंदोलन अराजकीय स्वरूपाचे असेल.

पुणे बाजार समितीत ४ हजार बोगस परवाने देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.  फुलबाजारातील गाळ्यांचे वाटप शेतकऱ्यांऐवजी केस कापणारे, गुटखा विक्रेते यांना करण्यात आले आहे. पार्किंगच्या नावाखाली लूट केली जात असून, अधिकृत पावती १० रुपये, प्रत्यक्ष वसुली २००–३०० रुपये वसूल केले जात आहेत. रोजंदारी भरतीतून नवीन घोटाळ्याचा डाव. माथाडी कायद्याचा गैरवापर.

 

अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करावी
“अजित पवार कडक नेते आहेत. मात्र, संचालक मंडळ त्यांच्या नावावर घोटाळे करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लाटणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याचा आभास होत आहे. त्यामुळे अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे,” असे रोहित पवार यांनी नमूद केले.

 

महाराष्ट्र सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय?

जी-५६ व्यवहार व घुले परिवारावर आरोप
बाजार समितीच्या ५६ जागा चुकीच्या पद्धतीने वाटप.  अजित पवार गटाचे संचालक गणेश घुले व गौरव घुले यांचा सहभाग. या जागांमधून दरमहा १.५ ते २ कोटी रुपयांचे अवैध भाडे घुले परिवाराला मिळत असल्याचा आरोप.

 मंत्रालयापर्यंत ‘पाकीट राजकारण’
रोहित पवार म्हणाले, “अधिवेशनात घोटाळ्याचा मुद्दा मांडल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीची घोषणा झाली. मात्र, चौकशी समितीतच भ्रष्टाचारात सहभागी असलेले जिल्हा उपनिबंधक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत पाकिटे पोहोचत असल्याने चौकशी केवळ दिखाव्यापुरतीच ठरत आहे.”
Local ad 1