...

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना कधी जाहीर होणार? ; मोठी अपडेट

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी अंतिम प्रभाग (वॉर्ड) रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान ही अंतिम प्रभाग रचना सार्वजनिक करणे आवश्यक असून, शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.

 

 

महापालिकेचे उपायुक्त सामान्य प्रसाद काटकर यांनी सांगितले की, मान्यतेनंतर अंतिम वॉर्ड रचना सोमवारपर्यंत गॅजेट पब्लिकेशन द्वारे जाहीर केली जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे आणि नियमानुसार पार पडणार आहे.

 

सदर प्रभाग रचना आगामी महापालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक वॉर्डमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी अंतिम रूपात तयार करण्यात आली आहे. या रचनेत नागरिकांचे प्रतिनिधित्व योग्य प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे.

 

या टप्प्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे मतदान केंद्रांची आखणी व निवडणूक साहित्याची तयारी. प्रभाग रचनेची ही महत्त्वाची भूमिका असल्याने सर्व तयारी वेळेवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Local ad 1